SIR प्रक्रिया मोठा घोटाळा, ममता बॅनर्जींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एसआयआर (SIR) प्रक्रियेवरून निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले असून, या प्रक्रियेला त्यांनी खूप मोठा घोटाळा, असल्याचे म्हटले आहे.

ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत की, SIR ही केवळ सामान्य प्रक्रिया नाही, तर याद्वारे मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळण्याचे काम केले जात आहे. त्यांच्या दाव्यानुसार, मतदार यादीतून सुमारे ९० लाख नावे हटवण्यात आली आहेत. हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित असून भारतीय जनता पक्षाला सत्तेत आणण्यासाठी हा खेळ खेळला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

ममता यांनी निवडणूक आयोगाच्या (ECI) भूमिकेवरही कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. ही प्रक्रिया पारदर्शक नसल्याचे सांगत त्यांनी हा लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रकार असल्याचे म्हटले आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या, “एसआयआर हा खूप मोठा घोटाळा आहे. हे भाजपला सत्तेत आणण्याचे प्रयत्न असून मतदारांची नावे वगळण्याचे राजकारण सुरू आहे.”