
पोलीस बंदोबस्तावेळी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्याला खडक पोलिसांनी अटक केले. ही घटना काल सकाळी पावणेआठच्या सुमारास गुरुवार पेठेतील मीठगंज पोलीस चौकीजवळ घडली.
मोहम्मंद अली मेहदी गंजी (वय 50 रा. वानवडी ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई बलटू घाडगे यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीठगंज पोलीस चौकीचे अधिकारी आणि कर्मचारी काल हद्दीत बंदोबस्त करीत होते. त्यावेळी मित्रासोबत आलेल्या मोहम्मंदने बलटू घाडगे यांच्याशी हुज्जत घातली. त्यांना अरेरावी करीत शिवीगाळ केली. त्यानंतर पोलिसांना आमची ओळख तुमच्या खात्यात कुणापर्यंत आहे, हे तुम्हाला दाखवितो अशी धमकी दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राहूल खंडाळे तपास करीत आहेत.
































































