
किरकोळ कारणावरून तरुणाला दांडक्याने मारहाण करून गाडीचे नुकसान करणाऱ्याला वानवडी पोलिसांनी अटक केली. ही घटना 5 फेब्रुवारीला रात्री सव्वा दहाच्या सुमारास पुण्यातील साळुंखे विहार परिसरात घडली होती.
तुषार दादा लोखंडे (19, रा. वानवडी ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ज्वाला यादव (28,रा.कोंढवा-खुर्द ) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी ज्वाला 5 फेब्रुवारीला रात्री सव्वा दहाच्या सुमारास मित्रासह घराकडे चालले होते.
त्यावेळी साथीदारांसह आलेल्या तुषारने ज्वाला यांना दांडक्याने मारहाण केली. त्यांच्या गाडीची तोडफोड करून 5 हजारांचे नुकसान केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक भगवान कांबळे तपास करीत आहेत.





























































