
युवतीचे सोशल मीडियावर बनावट अकाउंट उघडून बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी निर्मलनगर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
तक्रारदार युवती ही वांद्रे परिसरात राहते. तिचे सोशल मीडियावर एक अकाउंट आहे. तिचे लग्न ठरले आहे. अज्ञात व्यक्तीने युवतीच्या नावाने विविध बनावट अकाउंट तयार केले. त्या अकाउंटवर युवतीच्या कुटुंबीयांना अश्लील भाषेत मेसेज पाठवले जात होते. अज्ञात व्यक्तीने युवतीचे 5 बनावट अकाउंट बनवले.
मार्च महिन्यात एका अकाउंटवरून युवतीच्या पतीला मेसेज करून पैशाची मागणी केली. ती व्यक्ती कोण आहे याची खात्री करण्यासाठी युवतीच्या पतीने स्कॅनरद्वारे 1 रुपया पाठवला. त्या व्यक्तीने मेसेज करून कमी पैसे का पाठवले असा मेसेज केला. त्या व्यक्तीने धमकावून पैशाची मागणी केली. त्याने पुन्हा बनावट अकाउंट तयार करून युवतीची बदनामी केली.





























































