पुणे कोयत्याच्या धाकाने मोटार चालकाला लुटणारा अटकेत

317

कोयत्याचा धाक दाखवून तीन साथीदारांच्या मदतीने मालवाहू मोटार चालकाला लुटणाऱ्याला सिंहगड पोलिसांनी अटक केली. ही घटना काल मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास वडगाव उड्डाण पूलावर घडली होती.

उमेश रमेश जगधने (वय 30 रा. गणपतनगर, बिबवेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचे तीन साथीदार फरार आहेत. याप्रकरणी मनजित साह (वय 35, रा. नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल मध्यरात्री सव्वा दोनच्या सुमारास मनजित मालवाहतूक करणारा ट्रक घेउन मुंबईकडे चालले होते. त्यावेळी पाठीमागून  वडगाव उड्डाणपूलावर दोन दुचाकीवर आलेल्या चौघा चोरट्यांनी मनजितला अडविले. कोयत्याचा धाक दाखवून उमेशने इतर तीन साथीदारांच्या मदतीने मनजितचे सोन्याचे लॉकीट, पाकिटासह साडेचार हजारांची रोकड चोरुन नेली होती. त्यानंतर पोलिसांनी उमेलशला अटक करीत इतरांचा शोध घेतला जात आहे. पोलीस उपनिरीक्ष व्हि.जी. महांगडे अधिक तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या