
बायकोशी झालेला वाद आणि मुंबई विद्यापीठात सुरक्षा रक्षकाने हटकल्याचा राग डोक्यात ठेवून विद्यापीठात बॉम्बच्या अफवेचा पह्न करणाऱयाला बीकेसी पोलिसांनी अटक केली. सूरज धर्मा जाधव असे त्याचे नाव असून त्याच्या विरोधात खेरवाडी आणि वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या गुह्यात त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुंबई ही नेहमीच दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असते. त्यातच काही जण दारूच्या नशेत तर काही जण मजेसाठी शहरात बॉम्ब ठेवल्याच्या अफवेचा पह्न करतात. तीन दिवसांपूर्वी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात एक पह्न आला होता. पुढील दहा मिनिटांत मुंबई विद्यापीठात बॉम्बस्पह्ट होणार असल्याचे सांगून पह्न कट करण्यात आला. त्याची दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकारी बीडीडीएसचे पथक, अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी गेले. विद्यापीठ परिसर प्रचंड मोठा असल्याने नेमके कुठे काय घडेल हे स्पष्ट होत नव्हते. बीडीडीएसने विद्यापीठ परिसर पिंजून काढल्यावर तो अफवेचा पह्न असल्याचे उघड झाले. अफवेचा पह्न केल्याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. प्रभारी पोलीस निरीक्षक कन्हैयालाल शिंदे यांच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी तपास करून अखेर सूरजला वाकोला येथून ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्याने अफवेचा पह्न केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी एक मोबाईल हस्तगत केला आहे.
पाऊण तास सुरू होता पाठलाग
अफवेचा पह्न केल्यानंतर सूरजने पह्न बंद करून ठेवला. काही वेळाने तो नंबर सुरू होताच त्या नंबरवर शिंदे यांनी पह्न करून सूरजला आपण वृद्ध असून मदत हवी आहे असे सांगून त्याला वाकोला येथे भेटण्यास बोलावले. सुरुवातीला सूरजने भेटण्यास नकार दिला. पह्न करणारे हे पोलीसच आहे असा अंदाज बांधून सूरजने पोलिसांना पाऊणतास पोलिसांना दमवले. अखेर पोलिसांनी फिल्डिंग लावून सूरजला गजाआड केले.





























































