अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यास सांगितल्याचा गैरसमजुतीतून चुलतभावावर वार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी अधिकाऱ्याला कारवाई करण्यास सांगितल्याच्या गैरसमजुतीतून नऊ जणांच्या टोळक्याने चुलत भावाला बेदम मारहाण करीत वार केला. ही घटना 26 जुलैला संध्याकाळी सहाच्या सुमारास येरवड्यातील गणेशनगरमध्ये घडली.

मुक्तारसिंग भादा (25, रा. गणेशनगर, येरवडा ) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. सुरजितिंसग भादा, हुकूमसिंग भदा, गजलसिंग भादा, करणसिंग भादा, अर्जुनसिंग भादा अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

फिर्यादी मुक्तारसिंग आणि आरोपी एकमेकांचे नातलग असून येरवड्यातील गणेशनगरमध्ये राहायला आहेत. मुक्तारसिंग यांनी महापालिकेतील अतिक्रमणविरोधी अधिकाऱ्यांना आरोपीच्या दिघीतील घरावर कारवाई करण्याचे सांगितल्याचा गैरसमज झाला. त्याच रागातून टोळक्याने मुक्तारसिंगला बेदम मारहाण करून वार करीत गंभीररित्या जखमी केले. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक भगवान गुरव तपास करीत आहेत.