पुणे – धक्कादायक! सिगारेट दिली नाही म्हणून दुकानदाराचे दात पाडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिगारेट दिली नसल्याचा राग आल्यामुळे चौघांनी मिळून दुकानदाराला मारहाण करीत त्याचे तीन दात पाडले. ही घटना येरवड्यातील जयप्रकाशनगरमध्ये घडली.मोसीन शेख, सुधीर चंद्रकांत गवस, आकाश तुजार, ओम वाघमारे (सर्व रा. येरवडा) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी हमीद अली गोहार (वय 35, रा. येरवडा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवड्यातील जयप्रकाशनगरमध्ये हमीद यांचे जनरल स्टोअर आहे. चार दिवसांपुर्वी मोसीनने हमीद यांच्या दुकानात जाउन सिगारेट मागितली. मात्र, दुकानात सिगारेट विकत नसल्याचे त्यांनी हमीदला सांगितले. त्याचा राग आल्यामुळे मोसीन हमीदच्या अंगावर धावून गेला. त्यावेळी हमीदचा मेव्हणा भांडण सोडविण्यासाठी पुढे आला असता, त्याला मारहाण करण्यात आली. त्यानंतर झालेल्या भांडणात सुधीर, आकाश आणि ओम यांनी मिळून हमीदला मारहाण करीत तीन दात पाडले आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सय्यद अधिक तपास करीत आहेत.