सेक्स करताना तरुणाला झाला रक्तस्राव, डॉक्टरांनी सांगितलं ‘हे’ कारण

इराणची राजधानी तेहरान येथे एक विचित्र प्रकार घडला आहे. शारीरिक संबंधांवेळी तरुणाला रक्तस्राव झाला असून तो गंभीर जखमी झाला.

द सन या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, एका तरुणाला तेहरान येथील रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आलं होतं. कारण, त्याच्या गुप्तांगातून रक्तस्राव होत होता. त्याची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांना त्याच्या त्रासाचं कारण समजलं.

सेक्स करताना अचानक गुप्तांगात असलेली एक लिगामेंट तुटल्याने त्याला रक्तस्राव होत होता. ही लिगामेंटच पुरुषाच्या लिंगाला शरीराशी जोडून ठेवण्याचं काम करते. तिला दुखापत झाल्याने त्याला भयंकर वेदना होत होत्या.

त्याच्या वेदना पाहून डॉक्टरांनी त्याच्यावर फक्त औषधोपचार करण्याचं ठरवलं. त्यांनी त्याला शारीरिक पथ्य पाळायचे नियम घालून दिले तसंच गोळ्या आणि औषधं सुरू केली.

लिगामेंट पूर्ववत होण्यास सहा आठवड्यांचा किमान वेळ अपेक्षित होता. तो पूर्ण केल्यानंतरही तरुणाच्या वेदना कमी झाल्या नाहीत. अखेर या घटनेनंतर पुन्हा वर्षभराने त्याने रुग्णालय गाठलं.

तेव्हा पुन्हा त्याची चाचणी करण्यात आली. त्यावेळी लिगामेंट पूर्ववत न झाल्याने त्याला वेदना होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या तरुणावर शस्त्रक्रिया केल्यानंतरही ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची खात्री देता येणार नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. तसंच, त्याचं खासगी आयुष्यही पूर्वीसारखं असेल का, याबाबतही ते सांगू शकत नाहीत, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या