आईच्या उपचारासाठी पैसे मागून फसवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
money_2000-notes_note

सामना प्रतिनिधी, मुंबई

कामानिमित्त ओळख वाढवून त्याने चर्चगेट येथे राहणाऱ्या नागरिकाचा विश्वास संपादन केला. चांगली ओळख झाल्यानंतर त्याने आईच्या उपचारासाठी दोन लाखांची मागणी करून 15 दिवसांत परत देतो असे आश्वासन दिले. पण पैसे मिळताच त्याचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर करून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

चर्चगेटच्या अग्रवाल हाऊसमध्ये राहणारे अतित अग्रवाल (40) यांची नितीन (नाव बदललेले) याच्याशी एका कामानिमित्त ओळख झाली. त्यानंतर नितीनने या ओळखीचा फायदा घेत अग्रवाल यांचा विश्वास संपादन केला. अग्रवाल यांच्याकडे पैसे असल्याचे हेरून त्याने पद्धतशीरपणे अग्रवाल यांना आपल्या जाळय़ात ओढले. त्यानंतर 14 ऑक्टोबर 2016 मध्ये नितीनने आईला स्वाइन फ्लू झाल्याचे कारण सांगत तिच्या उपचारासाठी अग्रवाल यांच्याकडे दोन लाखांची मागणी केली. हे पैसे 15 दिवसांत पुन्हा देतो असे आश्वासनदेखील त्याने दिले.

मात्र पैसे हातात पडताच ते नितीनने स्वतःच्या फायद्यासाठी वापरले. त्यानंतर बरेच दिवस लोटले तरी नितीनने पैसे परत केले नाहीत. नितीनने आपली फसवणूक केल्याचे कळताच अग्रवाल यांनी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याची तक्रार दिली.

summary- man cheated another over money