
सामना ऑनलाईन । आष्टी (शहीद)
वर्धा जिल्ह्यातील आष्टी (शहीद) लहान आर्वी येथे पतीने पत्नीसह दीड वर्षाच्या मुलीला विष पाजून गळफास घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनिल नारायण वानखडे असं ३७ वर्षीय व्यक्तीचं नाव असून त्यांनी पत्नी स्वाती अनिल वानखडे, दीड वर्षाची मुलगी आस्था या दोघींसह विष पिऊन नंतर गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
अनिल यांचा काही कारणावरून वडिलांशी वाद झाला होता. वादामुळेच ते मंगळवारी सायंकाळी सात वाजता पत्नी आणि मुलीसह घराबाहेर पडले. त्यानंतर विषारी औषध विकत घेऊन अप्पर वर्धा धरणाच्या परिसरात प्राशन केलं. त्यानंतर झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.





























































