‘जुगाड’ने केली जादू… उन्हाळ्यात देणार गार हवा, घरच्या घरी बनला कूलर

cooler

इंटरनेट हे एक असे जग आहे जिथे सर्व प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात, मग ते गंमतीशीर व्हिडीओ असो, कल्पकता किंवा ज्याला ‘जुगाड’ म्हणतात असे व्हिडीओ. कल्पकतेने भरलेले अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. ही एक प्रकारची प्रतिभा देखील म्हणू शकता, कारण जेव्हा एखादे काम अवघड किंवा अशक्य असते तेव्हा लोक या जुगाड म्हणजेच प्रतिभा वापरून त्यांचे काम सोपे आणि शक्य करतात. आणि कधी कधी जुगाड करून अशा गोष्टी करतात, ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. उदाहरणार्थ, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा जुगाड व्हिडीओ पहा.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने उन्हाळा येण्याआधीच उन्हाळ्यात थंड हवा मिळवण्याचा कसा प्रयत्न केला हे दाखवण्यात आले आहे. त्या व्यक्तीने घरात असलेल्या पाण्याच्या टाकीतून कुलर बनवला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, निळ्या रंगाची प्लास्टिकची पाण्याची टाकी आहे, ज्यामध्ये त्या व्यक्तीने एक्झॉस्ट टाकून ते थंड केले आहे. याशिवाय थंड हवेसाठी टाकीत गवतही वापरण्यात आले आहे.

हा कुलर जुगाडपासून बनवला असला तरी तो दिसायला एकदम स्टायलिश दिसतो. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर desijugad7 नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. लोक व्हिडीओला खूप पसंत करत आहेत आणि सर्वजण याचे कौतुक करत आहेत. मात्र हा प्रयोग करण्याआधी कुणालाही विजेचा धक्का बसणार नाही, अपघात होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.