300 शब्दांचा निबंध लिहिला अन् 103 किमी वेगाने मर्सिडीज चालवली! व्हिडिओ व्हायरल

पुण्यातील पोर्शे कार अपघाताच्या प्रकरणातील आरोपीची शिक्षा नागरिकांनी चांगलीच मनावर घेतली. या प्रकरणातील आरोपीला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा दिली होती. सध्या याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कंटेंट क्रिएटर गजोधर सिंग कूल या नावाने ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीने ताशी 80 ते 103 किमी वेगाने मर्सिडीज कार चालवली आहे. गजोधर आपली कार वेगात चालवत असताना एका बाजूला त्याने 300 शब्दांचा निबंध तयार ठेवल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्याचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

गजोधरच्या या व्हिडिओचा हेतू हा पुण्यातील पोर्शे प्रकरणाला ट्रोल करण्याचा होता. या व्हिडीमध्ये त्याच्या एका हातात एक निबंध लिहिलेली वही आहे. मी 300 शब्दांचा निबंध लिहिला आहे. त्यामुळे आता मी कशीही माझी कार चालवू शकतो. असे त्याने या व्हिडीओत म्हटले आहे. 26 मे रोजी अपलोड केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 8 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. तर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

भावा हा निबंध लिहिण्याचा नियम फक्त पोर्शे कार चालवणाऱ्यांसाठीच लागू होतो, असे एका युजरने या व्हिडीओच्या कंमेंटमध्ये लिहिलंय. ही ऑफर फक्त पुणेकरांसाठी असल्याचे तर अन्य एका युजरने म्हटले आहे. तर एकाने निबंध वगैरे सगळं ठीक आहे. पण गाडी चालकाचे वय 18 पेक्षा कमी आणि वडिल श्रीमंत असणे गरजेचे आहे, असे म्हणत प्रत्यक्षपणे घटनेवर टीका केली आहे.

बड्या बिल्डरच्या मुलाच्या पॉश कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू