लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या युवकाला मिळाली ‘ही’ शिक्षा!

3678

लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणे हा इतर देशांत गुन्हा मानला जातो. या गुन्ह्यासाठी कठोरात कठेर शिक्षेचीही तरतूद आहे. असाच गुन्हा करणाऱ्या युवकाला इंडोनेशियात सार्वजनिक ठिकाणी 100 चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा सुनावण्यात आली. त्याला फटके मारण्यास सुरुवात झाल्यावर काही वेळातच तो बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला वैद्याकीय सुविधा देण्यात आली. त्यामुळे तो शुद्धीवर आला. शुद्धीवर येताच त्याला पुन्हा चाबकाचे फटके मारण्यात आले. त्यामुळे त्याची प्रकृती बिघडली आणि त्याला रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेचा जगभरातून निषेध होत आहे.

इंडोनेशिया हा मुस्लीमबहुल देश आहे. या देशात इस्लामीक कायद्यानुसार शिक्षा सुनावण्यात येतात. जुगार खेळणे, मद्यपान करणे, समलैंगिक असणे आणि विवाहापूर्वी शारीरिक संबंध ठेवणे यासारख्या गोष्टी या देशात गुन्हा मानण्यात येत असून त्यासाठी कठेरात कठेर शिक्षा सुनावण्यात येतात. एका 22 वर्षांच्या युवकाला विवाहापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याच्या आरोपाखाली सार्वजनिक ठिकाणी 100 चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याने शरिया अधिकाऱ्यांकडे दयेची याचना केली. मात्र, या शिक्षेची अंमलबजावणी करावीच लागेल, असे अधिकाऱ्यांनी त्याला सांगितले.

सार्वजनिक ठिकाणी गुरुवारी या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आली. त्याला चाबकाचे फटके मारल्यानंतर तो बेशुद्ध पडला. त्याला तातडीने वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आली. तो शुद्धीवर आल्यावर अधिकाऱ्यांनी पुन्हा शिक्षेच्या अंमलबाजावणीस सुरवात केली आणि त्याला चाबकाचे फटके मारण्यात आले. त्यामुळे त्याची प्रकृती खालावली. त्यामुळे त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या युवकासोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या महिलेलाही 100 चाबक्याच्या फटक्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचीही अंमलबाजावणी करण्यात आली. या युवकाची प्रकृती बिघडल्याने अशा शिक्षेविरोधात आवाज उठवण्यात येत आहे. मात्र, आम्ही धार्मिक नियमांनुसार शिक्षा देत असल्याचे शरिया अधिकाऱ्यांनी सांगितले.

इंडोनेशियात जुलै महिन्यात तीन जणांना विवाहापूर्वी शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी 100 चाबक्याच्या फटक्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती. तर दोन पुरुषांनी अल्पवयीन मुलींशी संबंध ठेवल्याप्रकरणी त्यांनाही अशीच शिक्षा करण्यात आली होती. इतर गुन्हांसाठीही अशाच शिक्षेची तरतूद आहे. कमीतकमी 12 तर जास्तीतजास्त 100 चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा सुनावण्यात येते. इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनीही अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी देण्यात येणाऱ्या शिक्षा रद्द करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, अशा कठोर शिक्षेची गरज असल्याचे जनतेचे मत आहे. अनेक वर्षांपासून अशा शिक्षा प्रचलीत आहेत. या धार्मिक बाबीत कोणीही हस्तक्षेप करू नये, असे जनतेचे मत आहे. या युवकाच्या शिक्षेवेळी 500 पेक्षा जास्त नागरिक उपस्थित होते आणि ‘मारा, अजून मारा, जोरात मारा’ अशी नारेबाजी ते करत होते. या घटनेमुळे जगभरातून निषेध व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या