
लातूर शहरातील गांधी चौक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बाललैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीस 7 वर्षे सक्त मजुरी शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.
सदर प्रकरणातील पीडित अल्पवयीन मुलीला आरोपीने फूस लावून पळवून नेले होते. त्यानंतर तिच्या इच्छेविरोधात जबरदस्ती तिच्या सोबत शरीरसंबंध ठेवले. याप्रकरणी मुलीच्या पालकांनी 5 फेब्रुवारी 2016 रोजी पोलीस स्टेशन गांधी चौक येथे तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. विशेष सत्र न्यायाधीश बी.सी. कांबळे यांनी आरोपी मनोज छगन कांबळे (वय 25 वर्ष) यास त्याने केलेल्या कृत्याची शिक्षा म्हणून 7 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व 1000 रुपये दंड सुनावला आहे. तसेच दंड न भरल्यास 6 महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे अॅड.मंगेश महेंद्रकर यांनी बाजू मांडली.


























































