अंगावर चहा सांडल्याने मिळाले 58 लाख रुपये

चार वर्षांपूर्वी एका युवकाच्या मांडीवर चहा सांडला होता. त्यानंतर मुलाच्या आईने एअरलाइन्स कंपनीच्या विरोधात खटला भरला होता. त्याचा निकाल लागला असून कोर्टाने युवकाला झालेल्या दुखापतीबद्दल त्याला नुकसानभरपाई म्हणून 58 लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. चार वर्षांनी हा युवक आता मालामाल झाला आहे.

ही घटना आयर्लंडमध्ये घडली होती. एमरे कराक्या असे मुलाचे नाव आहे. ही घटना घडली तेव्हा एमरे 13 वर्षांचा होता. तो तर्पिश एअरलाइन्सने डब्लीन येथून इस्तंबूल येथे जात होता. त्यावेळी विमानात केबिन क्रू सदस्याने त्याच्या पायावर गरम चहाचा कप सांडला होता. त्यामुळे एमरे खूप घाबरला. त्याच्यावर शारीरिक आणि मानसिक परिणाम झाल्याचा दावा करत त्याच्या आईने एअरलाइन्स कंपनीला कोर्टात खेचले होते.

आपली प्रतिक्रिया द्या