भररस्त्यात कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या, व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । हैदराबाद

मुलाच्या हत्येचा सूड म्हणून दोन भावांनी भररस्त्यात कुऱ्हाडीने वार करून एकाची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेची व्हिडीओही व्हायरल झाला आहे. यावेळी तिथे पोलीसही उपस्थित होते. त्यांनी आणि रस्त्यावरून जाणाऱ्या काही लोकांनी त्यांना रोखण्याचाही प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी झाला.

बुधवारी दुपारी ही भयंकर घटना घडली. जे. रमेश असं हत्येच्या बळीचं नाव आहे. किशन गौड आणि लक्ष्मण गौड अशी या घटनेतील आरोपींची नावं आहेत. किशन आणि लक्ष्मण यांनी बाईकवरून रमेश याचा पाठलाग केला आणि त्याला गाठून मारहाण करायला सुरुवात केली. रमेशने तिथून पळून जायचा प्रयत्न केला. तिथे उपस्थित असणाऱ्या ट्रॅफिक पोलिसाकडेही त्याने मदत मागितली. पोलिसाने या दोघांनाही रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, सूडाने पेटलेल्या या दोन्ही भावांनी पोलिसाला न जुमानता रमेशवर हल्ला केला आणि त्याच्यावर कुऱ्हाडीचे वार करायला सुरुवात केली. या दरम्यान, वाटसरूंनीही त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी वार करणं सुरूच ठेवलं. या हल्ल्यामुळे रमेश जागीच मृत्युमुखी पडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास नऊ महिन्यांपूर्वी या प्रकरणाची सुरुवात झाली होती. किशन गौड याचा मुलगा महेश आणि रमेश या दोघांचेही एकाच महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्यानंतर २०१७मध्ये महेश याची हत्या झाली होती. या हत्येचा आरोप रमेशवर होता. बुधवारी याच हत्येच्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी रमेश कोर्टात आला होता. कोर्टातून तो घरी जाण्यासाठी बाहेर पडल्यानंतर या दोघा भावांनी त्याचा पाठलाग करून त्याची हत्या केली. रमेशला ठार केल्यानंतर या दोघांनी हातातली कुऱ्हाड तिथेच टाकली आणि पोलिसांना शरण आले.

summary- man got murdered in hyderabad