‘व्हिएग्रा’चा अतिडोस घेतल्याने तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू

शक्तिवर्धक व्हिएग्रा गोळ्यांचा अतिडोस घेतल्याने भंडारा येथे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. भंडारा बसस्थानक परिसरात हिरणवार लॉजवर मैत्रिणीसोबत तरुण थांबला असताना हा प्रकार समोर आला. मृत तरुणाचे मोबाईलवरून एका तरुणीसोबत प्रेमसंबंध जुळल्यानंतर ते दोघे भंडाऱ्यात भेटले. यावेळी दिवसभर मैत्रिणीसोबत खरेदी केल्यानंतर तरुणाने 4 पैकी 2 व्हिएग्रा गोळ्यांचे सेवन केले. त्यामुळे रक्तदाब वाढून त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

भंडारा येथे मृत्यू झालेला 27 वर्षीय मृत तरुण नागपूरचा असून, 23वर्षीय मैत्रीण गोंदियाची आहे. काही महिन्यांपूर्वी ओळख झाल्यानंतर या ओळखीचे मैत्रीत व त्यानंतर प्रेमात रूपांतर झाले. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले असता तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी सांगितले की, शवविच्छेदन अहवालातूनच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.