
मुंबई शहरात बॉम्बस्फोट घडवून आणणार असल्याचा फोन वांद्रे रेल्वे पोलिसांना करणाऱयाला अखेर पोलिसांनी शोधून काढले आहे. फोन करणारी व्यक्ती ही दुबई मध्ये राहत असून ती मानसिकदृष्टय़ा ठीक नाही. त्याने गुजरातच्या गांधीधाम पोलीस ठाण्यात घातपात करणार असल्याचा फोन केला होता, अशी माहिती तपासात समोर आली आहे.
शनिवारी दुपारी वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यात एक फोन आला. फोन करणाऱयाने त्याचे नाव जावेद, असे सांगून मुंबईत बॉम्बस्फोटाची मालिका घडवण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात आले. त्या फोनची दखल घेऊन रेल्वे पोलिसांनी सर्व पोलिसांना सतर्प केले. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला होता. तसेच मुंबईतील प्रमुख रेल्वे स्थानकांची श्वान पथकाच्या मदतीने शनिवारी कसून तपासणी करण्यात आली होती. बॉम्बस्फोटाचा तो नेमका फोन पुठून आला याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला. तपासा दरम्यान पोलिसांनी त्या नंबरची माहिती काढली. तो फोन दुबई येथे राहणाऱया एकाने केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी फोन करणाऱया व्यक्तीच्या आईला शोधून काढले आहे. फोन करणारा हा मानसिकदृष्टय़ा ठीक नसून त्याने फोन करून बॉम्ब स्फोटाची धमकी दिली आहे. तो पूर्वी दुबई मध्ये एका ज्वेलर्सच्या दुकानात काम करत होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.
गुजरात पोलिसांना देखील केला फोन
फोन करणाऱया व्यक्तीने शुक्रवारी गुजरातच्या गांधीधाम पोलीस ठाण्यात फोन केला होता. तेव्हा डय़ुटीवर असणारे पोलीस निरीक्षक जडेजा याना गुजरात आणि लोकलमध्ये बॉम्बस्फोट करणार असल्याचे सांगितले होते.
बॉम्बस्फोटाचा फोन करणाऱया व्यक्तीला रेल्वे पोलिसांनी शोधून काढले आहे. त्याच्या समुपदेशनासाठी आम्ही गृहमंत्रालयाला पत्र लिहिणार आहोत. गृहमंत्रालयाच्या माध्यमातून दुबईतील दूतावासाला संपर्प करून त्याचे समुपदेशन केले जाईल.
पैसर खालिद, रेल्वे लोहमार्ग पोलीस आयुक्त, मुंबई


































































