भयंकर! भटक्या कुत्र्यांनी तोडले जिवंत माणसाचे लचके

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुत्रा हा पाळीव प्राणी म्हणून जितका प्रामाणिक असतो तितकाच भटक्या जातीचे कुत्रे हे खतरनाक असतात. झारखंडमध्ये काही भटक्या कुत्र्यांनी एका व्यक्तीवर हल्ला करून त्याचे लचके तोडले आहेत. यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असून त्याचे शरीर छिन्नविछिन्न केले होते. त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे झालेले पाहून पोलिसांनाही धक्का बसला आहे.

झारखंडमधील रामगढ येथे राहणाऱा संतोष उराल हा पोलीस कॅन्टीनमध्ये कूकचे काम करायचा. संतोषला दररोज रात्री दारू प्यायची सवय होती. नेहमीप्रमाणे तो रात्री दारू प्यायला. त्यानंतर पहाटे तो दामोदर नदीच्या किनारी शौचासाठी गेला होता. त्यावेळी तेथून काही अंतरावर असलेल्या स्मशानातील भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला व त्याचे लचके तोडले. सकाळी जेव्हा रस्त्यावर लोकांची वर्दळ सुरू झाली तेव्हा संतोषचा छिन्नविछिन्न मृतदेह रस्त्यावर पडलेला होता. त्याच्या संपूर्ण शरीरावर कुत्र्यांनी चावलेल्याच्या जखमा आहेत.