
कोंढव्यात दगडाने ठेचून करण्यात आलेल्या खुनाचा उलगडा करण्यास पोलिसांना यश आले आहे. प्रेम संबंधातून खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सिध्दार्थ उर्फ धुमाळ मनोज शिरसवाल (वय 28, रा. वानवडी) याला अटक करण्यात आली आहे. अजय दादू खुडे (वय 31) असे खून झालेल्याचे नाव आहे.
कोंढाव्यात पाण्याच्या टाकीजवळ गुरुवारी सकाळी एका तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर कोंढवा पोलिसांनी काही वेळातच त्याची ओळख पटविली होती. संबंधित तरुणाचे नाव अजय असून त्याच्या पत्नीचे सिद्धार्थ उर्फ धुमाळशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे सिद्धार्थने अजयचा खून केला असावा असा संशय पोलिसांना होता. त्यानुसार पोलिसानी सिध्दार्थचा शोध घेतला असता तो जांबूळकर कॅनोल लगत लपुन बसला असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, पोलीस निरीक्षक महादेव कुंभार, सहायक निरीक्षक चेतन मोरे, आनंत भोसले, अनिल साळुंखे, निलेश वणवे, ज्योतिबा पवार, आदर्श चव्हाण, किशोर वळे, किरण मोरे यांच्या पथकाने केली.



























































