मुलीला चिडवणाऱ्याला जाब विचारल्याने भांडण झाले, मध्यस्ती केल्याने भावावर वार

murder-knife

पुण्यातील येरवडा भागामध्ये शुल्लक कारणावरून भांडण झालं होतं. हे भांडण सोडवायला गेलेल्या तरुणावर वार करण्यात आले आहेत. विकास असं जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर वार केल्याप्रकरणी सोनू सोनावणे (19 वर्षे) याला अटक करण्यात आली आहे.

सोमवारी संध्याकाळच्या सुमारास आरोपी सोनूच्या शेजारच्या घरात एक मुलही रडत बसली होती. मयत विकासची आई या लहान मुलीला ओरडली होती, ज्यामुळे ती रडत होती. या मुलीला सोनू सोनावणे याने चिडवलं होतं. सोनू लहान मुलीला चिडवत असल्याचं विकासच्या लहान भावाने पाहिलं होतं. त्याने सोनूला मुलीला का चिडवतोस ? असा जाब विचारला होता. यावरून सोनूने विकासच्या भावाशी भांडायला सुरुवात केली. विकासने हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. सोनू कोणाचंही ऐकायच्या मनस्थितीत नव्हता त्याने त्याच्या एका अल्पवयीन साथीदारासोबत मिळून विकासवर चॉपरने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये विकास जखमी झाला असून सोनूला त्याच्यावर हल्ला केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या