
सामना ऑनलाईन। मुंबई
मुंबईमध्ये एका अनोळख्या व्यक्तीने महिलेला व्हिडीओ कॉल केला आणि प्रायव्हेट पार्ट दाखवत हस्तमैथुन केल्याची संतापजनक घटना घडल्याचे समोर आले आहे. महिलेने या घटनेचा स्क्रिनशॉट काढला व तो पोलिसांना दिला आहे. महिलेला व्हिडीओ कॉल करून अश्लिल चाळे करून दाखवल्याची ही मुंबईतील पहिलीच घटना आहे.
व्यवसायाने महिला स्क्रिप्ट रायटर आहे. शुक्रवारी तिला अनोळख्या क्रमांकावरून मोबाईलवर व्हि़डीओ कॉल आला. तिने तो रिसिव्ह करताच समोरची व्यक्ती तिला प्रायव्हेट पार्ट दाखवत हस्तमैथुन करू लागली. यामुळे महिला हादरली तिने लगेचच स्क्रिनशॉट काढला. त्यानंतर महिेलेने मुंबई पोलिसांना ट्वीट करत झालेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तिला एफआयआर करण्यासाठी पोलीस ठाण्यात बोलावले. त्यानंतर सायबर पोलिसांच्या मदतीने लवकरच आरोपीपर्यंत पोहचून त्यावर योग्य ती कारवाई करू असे पोलिसांनी म्हटले आहे

























































