सहा महिन्याच्या बाळावर बलात्कार, पोलिसांवर काकाचा गोळीबार

उत्तर प्रदेश मधील हमीरपूर जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी आणि एक हादरवणारी घटना घडली आहे. अवघ्या सहा महिन्यांच्या कोवळ्या जीवावर सख्या काकानेच बलात्कार केला.  पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बाळाला तिच्या आईने  अंगणामध्ये अंथरूण घालून ठेवले होते, आजूबाजूला कोणी नाही हे पाहून तिच्या काकाने तिच्यावर बलात्कार केला. कोवळ्या जीवाला या वेदना सहन न झाल्याने हे बाळ रडायला लागलं होतं. बाळाचे रडणे ऐकून आई अंगणात आली तेव्हा आरोपी तिथून फरार झाला.  बाळाच्या आईने आरोपी दिराविरोधात मुस्करा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मुलीची प्रकृती चिंताजनक होती ज्यामुळे तिला स्थानिक रुग्णालयातून उरई मेडिकल कॉलेजमध्ये दाखल आले.

रक्ताने माखलेली पँट जंगलात लपवली

पोलीस अधीक्षक डॉ.दीक्षा शर्मा यांनी या गुन्ह्याबाबत बोलताना म्हटले की, सदर गन्ह्यातील आरोपीला पकडण्यात आले आहे. या आरोपीने बलात्कार केल्यानंतर रक्ताने माखलेली पँट एका जंगलात लपवून ठेवली होती. फरार झाल्यानंतर तो या जंगलात जाऊन लपला होता. पोलीस जेव्हा त्याला पकडायला गेले तेव्हा आरोपीने पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही आरोपीवर गोळीबार केला. गोळीबारामध्ये आरोपीच्या पायाला गोळी लागली ज्यामुळे तो जखमी झाला. पोलिसांनी त्याला पकडले असून पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. पोलीस अधीक्षक दीक्षा शर्मा यांनी पुढे म्हटले की,  बाळावर प्राथमिक उपचार केल्यानंतर बाळाला उरई मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीच्या आधारवर पुढील तपास सुरु आहे. या गुन्ह्यात आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.