व्हॉट ऍन आयडिया सर जी… फॉर्म्युला वन कारमधून विकतोय दूध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मीडियावर सध्या एका दूध विव्रेत्याचा व्हिडीओ त्याच्या हटके अंदाजामुळे चर्चेत आला आहे. हा विव्रेता चक्क फॉर्म्युला वन या रेसिंग कारसारख्या दिसणाऱया कारमधून दूध वितरण करताना दिसतोय. या कारच्या मागील बाजूला दुधाच्या दोन किटल्या दिसतायत. गंमत म्हणजे, काळ्या रंगाचे जॅकेट, डोक्यावर हेल्मेट असा फॉर्म्युला वन रेसिंग स्पर्धेत करतात तसाच पेहराव या दूध विक्रेत्याने केला आहे. ‘जेव्हा तुम्हाला एफ वन रेसर बनायचे असते, परंतु घरातल्यांच्या आग्रहास्तव तुम्हाला दुग्ध व्यवसायात मदत करावी लागते,’ असे मजेशीर पॅप्शन देत हा व्हिडिओ ‘रोड्स ऑफ मुंबई’ या पेजवरून शेअर केला आहे. दरम्यान, हा दूध वितरक उत्तर प्रदेशातील बस्ती जिह्यातील असून तो रोज अशाच पद्धतीने दूध वितरण करतो असे एका युजरने म्हटले आहे.

आनंद महिंद्रा झाले प्रभावित

दरम्यान, उद्योगपती आनंद महिंद्रा हेदेखील दूध विव्रेत्याची ही एफ वन कार बघून प्रभावित झाले आहेत. ‘हे वाहन रस्त्याच्या नियमांची पूर्तता करते की नाही, याबद्दल मला माहीत नाही. मात्र, मी बऱयाच काळापासून पाहिलेली ही सर्वात छान गोष्ट आहे. मला या रोड योद्धय़ाला भेटायचे आहे,’ असे ट्विट आनंद महिंद्रांनी केले आहे.