बारमध्ये एन्ट्री दिली नाही म्हणून पार्किंगमधील ट्रकमध्ये करायला लागला सेक्स, त्यानंतर केला भयंकर प्रकार

अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे एका तरुणाला बार मध्ये एन्ट्री नाकारल्याने त्याने चक्क त्याचा ट्रकच बारमध्ये घुसवला. ट्रक पार्किगमधून बाहेर काढताना त्याने चक्क तो उलटा नेत थेट बारला ठोकला व तसे करत असताना तो ट्रकमध्ये चक्क एका वेश्येसोबत सेक्स करत होता. या अपघातात ती वेश्या व आणखी दोन जणांचा जागीच म़ृत्यू झाला.

सदर तरुण दारुच्या नशेत तर्राट होऊन एका बारमध्ये जात होता. मात्र त्या बारच्या सुरक्षा चालकांनी त्याला एन्ट्री नाकारली त्यामुळे तो वैतागला. तो व त्याच्यासोबत आलेली वेश्या दोघेही परत त्याच्या ट्रकमध्ये जाऊन बसले. तिथे ते दारु पित सेक्स करत होते. त्याच वेळी त्या तरुणाने ट्रक सुरू केला व बाहेर काढू लागला. त्यानंतर त्याने वेग वाढवला व तसाच मागच्या मागे ट्रक बारवर नेऊन आदळला. या अपघाता ड्रायव्हरसोबत सेक्स करणारी वेश्या जागीच ठार झाली तर बारमधील दोघे गाडीखाली चिरडले गेले. त्या ड्रायव्हरचे नशीब बलवत्तर म्हणून तो या अपघातातून बचावला. त्या नंतर संतापलेल्या लोकांनी त्या ड्रायव्हरला पकडून पोलिसांत दिले.

त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वाहतूकीचे नियम मोडल्याप्रकरणीही वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या