धक्कादायक ! लूडो खेळताना खोकला, मित्राला घातली गोळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लूडो खेळताना समोरचा मित्र खोकल्याने त्याच्यावर गोळी झाडल्याचा प्रकार येथे घडला. खोकल्यामुळे कोरोना पसरतो या भीतीपोटी ही घटना घडल्याचे सांगितले जाते.मंगळवारी रात्री नॉयडाच्या सैंथली मंदिरात जय, गुल्लू, प्रवेस आणि प्रशांत असे चार मित्र लूडो खेळत होते. खेळ सुरू असताना प्रशांतला खोकला आला. प्रशांत हा खोकून कोरोना पसरवत असल्याचे प्रवेस याचा मुलगा करणसिंह याने म्हटले. त्यावरून झालेल्या वादात गुल्लू याने प्रशांतच्या मांडीवर गोळी झाडली.