घराच्या अंगणात लपवल्या 500 सायकली, ‘गुगल अर्थ’मुळे चोरटय़ाचे बिंग फुटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घराच्या अंगणात एका चोरटय़ाने लपवलेल्या 500 सायकली शोधण्यात टेम्स व्हॅली पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे पोलीस बऱयाच काळापासून या चोराचा शोध घेत होते. अखेर गुगल अर्थच्या मदतीने पोलिसांनी या चोराला पकडले असून चोरीच्या सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

ऑक्सफर्ड येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका 54 वर्षीय इसमाला ताब्यात घेतले आहे. या इसमाविरोधात नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत होत्या. पोलीस बऱयाच काळापासून या चोराचा शोध घेत होते. गुगल अर्थच्या मदतीने पोलिसांना त्याच्या घराची माहिती समजली आणि त्याची चोरी पकडली गेली. पोलीस त्याच्या घरी पोहोचले तेव्हा अंगणातील सायकलींचा खच पाहून ते हैराण झाले. दरम्यान, पोलिसांनी या सायकली जप्त केल्या असून सध्या ते सायकलीच्या मालकांचा शोध घेत आहेत.

n त्या व्यक्तीच्या शेजाऱयाने दिलेल्या माहितीनुसार, या इसमाच्या घरामागील अंगणात कित्येक दिवसांपासून सायकलीचा खच पडला आहे. त्याबाबत आम्ही त्याला विचारल्यावर आफ्रिकेतील गरजू लोकांसाठी आपण या सायकली गोळा करत असून लवकरच त्यांना पाठवणार असल्याचे त्याने आम्हाला सांगितले. तो कधी दिवसा तर कधी रात्री व्हॅनमधून सायकली आणायचा.