प्रवाशाने विमानात उतरवले कपडे, नग्नावस्थेत यायचे होते बाहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लखनौ

शनिवारी दुबईहून लखनौला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एका प्रवाशाने अंगावरचे सर्व कपडे उतरविल्याने एकच खळबळ उडाली. त्या प्रवाशाला नग्नावस्थेत विमानातून बाहेर यायचे होते. मात्र विमानातील कर्मचाऱ्यांनी त्याच्या अंगावर चादर टाकून त्याला एका खुर्चीवर बसवून ठेवले होते.

शनिवारी एअर इंडियाचे आयएक्स 194 हे विमान दुबईहून लखनौला येत होते. या विमानात एकूण 150 प्रवासी होती. विमान लखनौला लँड व्हायच्या काही वेळ आधी विमानातील एका प्रवाशाने त्याचे सर्व कपडे उतरविले. त्या प्रवाशाला आजुबाजुच्या लोकांनी थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने कुणाचेही ऐकले नाही. तो प्रवासी ऐकत नाही हे बघून विमानातील कर्मचाऱ्यांनी त्याच्या अंगावर चादर टाकली व त्याला खुर्चीवर बसवून ठेवले. विमान लँड होत नाही तोपर्यंत या कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून ठेवले होते. त्यानंतर त्या प्रवाशाला विमानतळाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. सध्या त्याची चौकशी करण्यात येत असून त्याने हे असे का केले, याचा पोलीस शोध घेत आहेत.