अरे बापरे ! घरात 100 हून अधिक विषारी साप पाळले, शेवटी अशी अवस्था झाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरात 124 विषारी सापांना पाळणाऱ्या माणसाचा तीन महिन्यांपूर्वी अचानक मृत्यू झाला होता. त्यावेळी त्याच्या मृत्यूचे कारण न समजल्याने अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली होती. मात्र आता तीन महिन्यानंतर त्या व्यक्तीच्या मृत्यूमागचे कारण समोर आले असून कारण ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

ही घटना अमेरीकेच्या मॅरीलॅण्ड परिसरातील आहे. 19 जानेवारी रोजी विषारी साप पाळणारा व्यक्ती मृतावस्थेत घरात सापडला होता. या व्यक्तीची ओळख समोर आलेली नाही. WRC-TV च्या वृत्तानुसार त्या व्यक्तीच्या शेजाऱ्याने सांगितले होते की, त्याच्या खिडकीतून ती व्यक्ती जमिनीवर पडलेल्या अवस्थेत दिसत होती. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. जेव्हा अधिकारी त्या व्यक्तीच्या घरी गेली त्यावेळी घरातले दृश्य पाहून ते हादरलेच. कोबरा, ब्लॅक मांबा अशा 100हून अधिक महाभयंकर विषारी सापांबरोबरच 14 फुटाचा बर्मी अजगरही होता. घरात 124 विषारी साप होते. त्यावेळी चार्ल्स काऊंटीच्या प्रवक्त्या जेनिफर हॅरिसने सांगितले की, आमच्या चीफ अॅनिमल कंट्रोल ऑफिसरने त्यांच्या 30 वर्षांच्या सेवेत अशी घटना कधीच अनुभवली नाही.

जेव्हा अधिकारी त्या व्यक्तीच्या घरी पोहोचले त्यावेळी सगळे साप एका पिंजऱ्यात बंद होते आणि त्यांना खूप सावधतेने पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते. त्या व्यक्तीने घरात जास्त काही अडगळही ठेवली नव्हती. त्यामुळे साप पळण्याचा प्रयत्न केला तरी दिसू शकतील अशा पद्धतीने ठेवले होते. हॅरिस यांनी सांगितले होते की, त्य़ा व्यक्तीने बेकायदेशीरपणे घरात विषारी साप ठेवले होते. त्यावेळी मुख्य वैद्यकिय अधिकाऱ्यांनी या गोष्टीला नकार दिला होता की त्या व्यक्तीचा मृत्यू सापाच्या दंशाने झालाय. त्यामुळे त्यावेळी अपघाती मृत्यू नोंद करण्यात आली होती. पण आता अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीचा मृत्यू सापाच्या दंशानेच झाल्याचे सांगितले आहे.