शरीरातून येत होता शिट्टीसारखा आवाज, ‘या’ व्यक्तिला आहे विचित्र आजार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका तरुणाच्या शरीरातून शिटी मारल्याचा आवाज येऊ लागला. त्याला या आवाजाचा थांगपत्ताच लागत नव्हता. मात्र दिवसेंदिवस त्याची तब्येत बिघडत होती. त्याला श्वासही नीट घेता येत नव्हता. मात्र डॉक्टरांनी तपासले असता तो आवाज त्याच्या वृषणातून येत होता आणि त्यामुळेच त्याची ती हालत झाली होती. या आजाराची ही पहिलीच व्यक्ती ठरली.

अमेरीकेतील ओहियो येथील ही घटना आहे. 72 वर्षाच्या एका व्यक्तीला शरीरातून शिट्टीचा आवाज ऐकू यायचा. त्यानंतर त्या व्यक्तीने तपास केला असता. त्याला विस्लिंग स्क्रोटम नावाचा आजार आहे. हा जगातला पहिला व्यक्ती आहे ज्याला अशाप्रकारचा गुप्तरोग आहे. हा दावा अमेरिकन जर्नल ऑॅफ केसच्या नव्या संशोधनात केला आहे. अभ्यासात सांगण्यात आले आहे की, या व्यक्तीला श्वास घेता येत नव्हता आणि तोंड सुजले होते. त्याने आपल्या या विचित्र अवस्थेबाबत डॉक्टरांना सांगितले. ज्यानंतर डॉक्टरांनी तातडीने त्याचे एक्सरे काढले आणि त्यातून कळले की त्यांच्या शरीरात जास्त प्रमाणात हवा आहे. त्यामुळे त्याची फुफ्फुसे आकुंचन पावत आहेत. डॉक्टरांनी सांगितले की, जर त्यावर लवकर उपचार केले नाहीत तर त्याचे हृदय किंवा फुफ्फुसे कायमचे निकामी होतील. ज्यामध्ये त्याचा मृत्यूही ओढावू शकतो. त्यानंतर व्यक्तीच्या शरीरातून येणाऱ्या आवाजाबाबतही कळले की, त्यांच्या स्क्रोटमच्या डाव्या बाजुला असलेल्या एका जखमेतून येत होता. झालं असं की 5 महिन्यांपूर्वी व्यक्तीच्या टेस्टिकल सर्जरी झाली होती. ही जखम त्यामुळेच झाली होती.

अहवालात सांगितले की, श्वास घ्यायला होणारा अडथळा आणि सुजलेल्या शरीराच्या शस्त्रक्रियेच्या गुंतागुतींमुळे असे झाले होतेय. व्यक्तीच्या शरीरातील हवा काढण्यासाठी त्यांच्या छातीत दोन प्लास्टीकच्या ट्युब लावाव्या लागल्या. रुग्णालयात तीन दिवस घालवल्यानंतर व्यक्तीच्या फुफ्फुसे सुरळीत झाली आणि त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.