
मनसेचा 9 फेब्रुवारीचा मोर्चा मरीन ड्राइव्ह ते आझाद मैदान असा निघणार आहे. पक्षाने हा मोर्चा भायखळ्याहून काढण्यासाठी परवानगी देण्याची विनंती केली होती, मात्र मुंबई पोलिसांनी त्यास परवानगी नाकारत मरीन ड्राईव्हहून मोर्चा काढण्यास सुचविले आहे.
देशातील पाकिस्तानी आणि बांगलादेशींना हाकलण्याच्या मागणीसाठी मनसे हा मोर्चा काढणार आहे. भायखळा परिसरात मुस्लिम समाजाची मोठी वस्ती आहे. हा समाज आधीच ‘सीएए’विरोधात रस्त्यावर उतरला आहे. अशातच मनसेचा मोर्चा या परिसरातून निघाल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवेल, या कारणास्तव पोलिसांनी भायखळा येथून मोर्चास नकार दिला.























































