काशीतील मणिकर्णिका घाट जमीनदोस्त

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला काशीतील मणिकर्णिका घाट बुलडोझर चालवून जमीनदोस्त करण्यात आला आहे. हे पाडकाम करताना अहिल्याबाईंचा पुतळा तोडला गेल्याचा आरोप लोकांनी केल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे.

मणिकर्णिका हा 84 प्रमुख घाटांपैकी एक आहे. अहिल्याबाई होळकर यांनी 1771 मध्ये हा घाट बांधला होता. 1791 मध्ये त्याचे नूतनीकरण करण्यात आले. या घाटासह हरिश्चंद्र घाटाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी सध्या पाडकाम सुरू आहे. घाटाचा काही भाग पाडण्यात आला आहे. हे करताना 300 वर्षे जुनी दगडी रचना देखील काढून टाकण्यात आल्याचा आरोप होत आहे.