
मानखुर्द-शिवाजीनगर पोटनिकडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या 25 पैकी सात उमेदवारांनी आज माघार घेतल्याने आता 18 उमेदवार रिंगणात आहेत. या वॉर्डमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांमुळे शिवसेनेकडून अर्ज दाखल केलेले विठ्ठल लोकरे यांचेच पारडे जड आहे.
मानखुर्द-शिवाजीनगर प्रभाग क्र. 141 च्या पोटनिवडणुकीसाठी 9 जानेवारी रोजी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना, काँग्रेस आणि भाजप, अपक्षांसह 25 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये शिवसेनेने विठ्ठल लोकरे, काँग्रेसने अल्ताफ काजी यांना तर भाजपने बबलू पांचाळ यांना संधी दिली आहे. 2017 मध्ये काँग्रेसचा उमेदवार म्हणून या प्रभागातून विठ्ठल लोकरे विजयी झाले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती.
11 अपक्ष उमेदवार
पोटनिवणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये 11 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. या पोटनिवडणुकीत 10 उमेदवार मराठी भाषिक तर 8 उमेदवार मुस्लिम भाषिक आहेत.





























































