
आर्यन खानच्या सुटकेनंतर ‘मन्नत’बाहेर वार्तांकन करणाऱया पत्रकार आणि रिक्षाचालकाचा मोबाईल लांबवणाऱया तिघांना वांद्रे पोलिसांनी अटक केली. अब्दुल झाहीद रहीम शेख, सर्फराज जाहिद खान, जयरुद्दीन शेख अशी त्या तिघांची नावे आहेत.
क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणात एनसीबीने आर्यन खानला अटक केली होती. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आर्यनच्या जामिनासाठी त्याच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने आर्यनला जामीन मंजूर केला होता. शुक्रवारी आर्यन जामिनावर सुटणार होता, मात्र कागदोपत्री प्रक्रिया राहिल्याने शनिवारी आर्यन आर्थर रोड तुरुंगातून बाहेर पडला. आर्यन 27 दिवसांनंतर घरी पोहचणार असल्याने त्याला पाहण्यासाठी ‘मन्नत’बाहेर प्रचंड गर्दी झाली होती. तर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी तेथे मोठय़ा संख्येने होते.
शनिवारी दुपारी एका टीव्ही चॅनेलचा प्रतिनिधी हा वार्तांकन करत होता. तेव्हा गर्दीचा फायदा घेऊन त्या पत्रकाराचा मोबाईल चोरीला गेला. त्यानंतर सांताक्रुझ येथील रहिवासी असलेला रिक्षाचालक हा भाडे घेऊन ‘मन्नत’जवळ आला होता. तेव्हा त्याचा मोबाईल चोरीला गेला. त्यानंतर आणखी एकाचा मोबाईल गर्दीत चोरीला गेला. मोबाईल चोरीप्रकरणी त्या तिघांनी गस्तीवर असलेल्या पोलिसांना घडल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी अब्दुल, सर्फराज आणि जयरुद्दीनला ताब्यात घेतले. त्या तिघांकडून पोलिसांनी चोरीला गेलेले दोन मोबाईल हस्तगत केले आहे. कसून चौकशी केल्यावर त्या तिघांनी मोबाईल चोरीची पोलिसांना कबुली दिली. त्या तिघांना अटक करून आज न्यायालयात हजर केले होते.
मुलाखत दिली आणि जेलमध्ये गेला
आर्थर रोड तुरुंगात आर्यन खानच्या बॅरेकमध्ये असलेल्या श्रवण नाडरला घरपह्डीच्या गुह्यात जुहू पोलिसांनी अटक केली. काही दिवसांपूर्वी श्रवणला माटुंगा पोलिसांनी अटक केली होती. तो आर्थर रोड जेलमध्ये होता. जेव्हा आर्यन आर्थर रोडमध्ये आला. त्यानंतर श्रवण हा तुरुंगातून बाहेर सुटला. बाहेर सुटल्यावर तो ‘मन्नत’ बंगल्यावर गेला. आपण आर्यन खानच्या बॅरेकमध्ये होतो. त्याला पैशाची गरज असल्याने बंगल्यावर आल्याचे श्रवणने ‘मन्नत’ बंगल्यावरच्या सुरक्षा रक्षकांना सांगून 10 हजारांची मागणी केली. तसेच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना एक मुलाखतदेखील दिली होती. ती मुलाखत पाहिल्यानंतर घरपह्डीच्या गुह्यात श्रवण जुहू पोलिसांना पाहिजे आरोपी होता. त्याला अखेर जुहू पोलिसांनी घरपह्डीच्या गुह्यात अटक करून न्यायालयात हजर केले.

























































