
बॉलीवूडचे अष्टपैलू अभिनेते मनोज वाजपेयी आगामी भोसले या चित्रपटात पहिल्यांदाच मराठमोळ्या अंदाजात पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात ते गणपत भोसले नावाच्या सेवानिवृत्त पोलीस कॉन्स्टेबलची भूमिका साकारत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे.
जातीय द्वेषाविरोधात उभे असलेल्या एक मराठी कॉन्स्टेबल भोसले यांची कथा यात मांडण्यात आली आहे. ट्रेलरमध्ये मनोज वाजपेयीसोबत मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरची जुगलबंदी पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने याआधीच मामि फिल्म फेस्टिवलमध्ये झळकून अनेकांकडून कौतुकाची थाप मिळवली आहे. ट्रेलरमुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे. हा चित्रपट येत्या 26 जून रोजी सोनी लिव्हवर रिलीज होणार आहे.

























































