मनोज बाजपेयीच्या आई गीता देवी यांचे निधन

सिनेजगतातून एक वाईट बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते मनोज बाजपेयी यांची आई गीता देवी यांचे निधन झाले आहे. गीता देवी यांनी दिल्लीतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील वसुंधरा एन्क्लेव्ह येथील धर्मशिला कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र गुरुवारी सकाळी त्यांनी वयाच्या 80 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.

प्रकृती खालावल्याने मनोज बाजपेयी शेवटच्या क्षणी आईसोबत होते. आईचे निधन झाल्यामुळे मनोज बाजपेयी यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांनी वडिलांना गमावले होते. ही बातमी समोर आल्यानंतर चाहते आणि सेलिब्रिटी मनोज बाजपेयी यांच्या आईला श्रद्धांजली वाहत आहेत. त्याचबरोबर या वाईट काळात त्यांना बळ मिळो, अशी प्रार्थनाही ते करत आहेत.