मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून लढा देणारे मनोज जरांगे-पाटील यांची तब्येत बिघडली असून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तब्येत बिघडल्याने त्यांचा पुढील येडशी, कळंब, धाराशिव, बीड भागातील दौरा रद्द करण्यात आला आहे.

जरांगे हे बुधवारी धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथे आले होते. तेथे मराठा बांधवांशी संवाद साधल्यानंतर ते पुढील दौऱ्यावर जात असताना त्यांना अस्वस्थ जाणवू लागले. त्यामुळे त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले