मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा बिघडली, रुग्णालयात दाखल

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून लढा देणारे मनोज जरांगे-पाटील यांची तब्येत बिघडली असून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये दौऱ्यावर असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच अर्थात 4 जूनपासून मनोज जरांगे – पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा आंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. राज्य सरकारने दिलेल्या दहा टक्के आरक्षणाचा मराठा समाजाला कवडीचाही फायदा होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.