सत्तेत अनेक वर्षे मराठे आमदार, मंत्री काम करत असताना या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा मंत्री आमदारांना काम न देता मराठय़ांच्या अंगावर मराठेच घालण्याचे काम करून मराठा समाजाला फडणवीस वेगळी वागणूक देत असून, द्वेष करत असल्याची टीका मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
उपमुख्यमंत्री फडणवीस आमचे विरोधक, शत्रू नसले तरी त्यांचा मराठय़ांबाबत द्वेष दिसून येत आहे. मराठा बांधवांना आरक्षण देता येत नसेल तर आम्ही तुमच्याविरोधी बोलल्याशिवाय राहणार नाही. मला राजकारणात न जाता समाजासोबत जायचे आहे. पण मराठा आरक्षण मिळाले नाही तर मी राजकारणावर बोलणारच, असा इशारा जरांगे यांनी दिला.
लाडकी बहीण योजना चांगली असली तरी बहिणीच्या मुलांना आरक्षण कधी देणार, असा सवाल करत लोकांना आयुष्यभरासाठी सुविधा द्या? आमचे पैसे घेऊन परत आम्हालाच देता ना, असा सवालही जरांगे पाटील यांनी केला.