मनोज नरवणे नवे लष्कर उपप्रमुख

207

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. लेफ्टनंट जनरल देवराज अंबू हे 31 ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत. सेवाज्येष्ठतेनुसार नरवणे यांची नियुक्ती केली आहे. लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांचे शालेय शिक्षण पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी प्रशालेत झाले. त्यांनी पुण्यातील एनडीए आणि डेहराडून येथील सैन्य अकादमी येथे लष्करी शिक्षण घेतले. 1980 मध्ये ते लष्करात शीख लाइट इन्फंट्रीच्या सातव्या बटालियनमध्ये दाखल झाले. 37 वर्षांची त्यांची लष्करी सेवा आहे. जम्मू-कश्मीरात राष्ट्रीय रायफल्स बटालियन आणि ईशान्य हिंदुस्थानात इफ्रंट्री ब्रिगेडचे त्यांनी नेतृत्व केले आहे. श्रीलंकेत हिंदुस्थानी लष्कराच्या शांतता सुरक्षा दलामध्येही त्यांनी काम केले आहे. लेफ्टनंट जनरल नरवणे यांना उल्लेखनीय कामगिरीसाठी परमविशिष्ट सेवा मेडल, अतिविशिष्ट सेवा मेडल, सेना मेडल आणि विशिष्ट सेवा मेडलने सन्मानित करण्यात आले आहे.  दरम्यान, सेवाज्येष्ठतेनुसार लष्करप्रमुख बिपिन रावत यांच्यानंतर मनोज नरवणे हे ज्येष्ठ लष्करी अधिकारी आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या