मनोजने धुडकावली हृतिकच्या वेबसिरीजची ऑफर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या ‘द फॅमिली मॅन-2’ या वेबसिरीजमुळे अभिनेता मनोज वाजपेयी चर्चेत आहे. यातील त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आगामी काळात अनेक चांगल्या ऑफर्स मनोजकडे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नुकताच त्याने हृतिकच्या डेब्यू वेबसिरीजमध्ये काम करण्यासाठी नकार कळवला आहे.

टॉम हिडलेस्टनच्या ‘द नाईट मॅनेजर’साठी निर्मात्यांनी मनोजला हत्यारांचा डिलर रिचर्ड रोपर्ड याची भूमिका साकारण्यासाठी विचारणा केली होती. ‘द नाईट मॅनेजर’मध्ये ही भूमिका ह्यूग लॉरी याने साकारली होती. मात्र तारखा नसल्यामुळे नाइलाजास्तव मनोजला या ऑफरवर पाणी सोडावे लागले आहे.

मनोजच्या एका जवळच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मनोज सर सिरीजसाठी बातचीत करत होते. मात्र कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे त्यांच्या आधीच्याच दोन प्रोजेक्टसाठी उशीर झाला आहे. सध्या ते उत्तराखंडमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहेत. त्यानंतर ते आपल्या उर्वरित प्रोजेक्टसाठी शूटिंग सुरू करतील. हृतिकच्या वेबसिरीजसाठी निर्मात्यांच्या तारखेनुसार वेळ नसल्याने मनोज यांनी ही ऑफर नाकारली आहे.