नवे नियम; 1 जूनपासून खिशाला कात्री

जून महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून अनेक नियम बदलणार आहेत. या बदलाचा परिणाम सर्वसामान्यांवर पडेल.  येत्या 1 जूनपासून घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात बदल होणार आहे. यासह वाहतुकीच्या नियमातही अनेक बदल होणार आहेत. निवडणुका झाल्या असल्याने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. ड्रायव्हिंग लायसेन्स संदर्भात नवीन नियम लागू होणार आहेत. 1 जूनपासून लोकांना ड्रायव्हिंग टेस्ट आरटीओच्या ऑफिसला जाऊन देण्याची गरज पडणार नाही. वाहतुकीच्या नियमात मोठे बदल होणार आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्याकडून मोठा दंड आकारला जाऊ शकतो. वेगाची मर्यादा ओलांडत एखाद्या व्यक्तीने गाडी चालवल्यास 2000 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. हा दंड अगोदर एक हजार रुपये होता. लायसन्स नसताना गाडी चालवल्यास 500 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.

आधारकार्डमध्ये अपडेट करायवयाचे असल्याचा 14 जूनपर्यंत मोफत करता येईल. आधार पेंद्रावर जाऊन अपडेट करायचे असल्यास 50 रुपये शुल्क आकारले जाईल.

अल्पवयीन मुलगा वाहन चालवताना आढळल्यास  5 हजार दंड व वाहन धारकाची नोंदणी रद्द केली जाईल. तसेच 25 वर्षांपर्यंत ड्रायव्हिंग लायसेन्स मिळणार नाही.