वाढत्या बांधकामांमुळे मानवी वस्तीत साप सापडण्याचे प्रमाण वाढले, नागरिकांमध्ये घबराट

सध्या मुंबईत सर्वत्र मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. या बांधकामांमुळे सध्या नागरि वस्त्यांमध्ये साप सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. मालाड, बोरिवली परिसरात गेल्या काही दिवसांपासून अचानक साप सापडण्याचे प्रकार समोर येत आहेत.

शनिवारी मालाड पूर्व येथील सैनिकी तळावरुन सर्पमित्र सुनील गुप्ता याने एका सापाची सुटका केली. तो साप रेड स्नेक प्रजातीचा असून पाच फूटांचा होता. मालवणी भागात देखील कोब्रा भागात साप सापडल्याने एकच खळबळ उडाली होती.  गेल्या दोन आठवड्याभरापासून गुप्ता याने 6 सापांची सुटका केली होती.

सुनील गुप्ता याने गेल्या 3 महिन्यात 39 सापांची सुटका केली. वाढत्या बांधकामांमुळे साप बाहेर पडण्याचे आणि साप सापडण्याचे प्रमाण वाढले आहे.