
सामना प्रतिनिधी, मुंबई
मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतचा अहवाल मागासवर्गीय आयोग 15 नोव्हेंबरपर्यंत राज्य सरकारला सादर करणार आहे. अहवाल सादर केल्यानंतरही जर मराठय़ांना आरक्षण लागू केले नाही तर राज्यभरात 1 डिसेंबरपासून बेमुदत आंदोलन करू, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिला आहे. मोर्चाचे पदाधिकारी महेश डोंगरे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
तुळजापूरपासून मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. ठोस निर्णय झाला नाही तर मराठा अधिक आक्रमक होईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी मराठा आरक्षणासाठी बळी गेलेल्या 35 युवकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदतही देण्यात आली. मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि सोलापूर जिल्ह्यातील भैरवनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष व शिवसेना आमदार तानाजी सावंत यांच्या वतीने ही मदत देण्यात आली.
summary- maratha andolan can be start from 1st december
























































