
लग्न व्यवस्था, इतर कार्यक्रम व समारंभ याबाबतीत आचारसंहिता घालून देण्यात आलेली आहे. सर्व समाज बांधवांनी या आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले.
पिपरी चिंचवड शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने काळेवाडी येथे बैठक झाली. वैष्णवी हगवणे – कस्पटे हिच्या बाबतीत जी दुर्घटना घडली त्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील सकल मराठा समाजाने लग्नव्यवस्थेसंदर्भात एकत्र बैठक घेऊन काही अटी व नियम लागू केलेले आहेत.
याच धर्तीवर पिंपरी चिंचवड शहर सकल मराठा समाजाचीही बैठक झाली. वैष्णवीस श्रद्धांजली अर्पण करून या बैठकीस सुरुवात करण्यात आली. या बैठकीत लग्न व्यवस्था व इतर कार्यक्रम व समारंभ याबाबतीत आचारसंहिता घालून देण्यात आलेली आहे. सर्व समाज बांधवांनी या आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात आले.
प्रास्ताविक भाऊसाहेब भोईर यांनी केले. सूत्रसंचालन नाना शिवले यांनी तर प्रशांत शितोळे यांनी आचारसंहितेचे वाचन करून आभार मानले. यावेळी शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख संजोग वाघेरे पाटील, आमदार शंकर जगताप, विलास लांडे, सुरेश भोईर, नाना काटे, मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राजेंद्र काsंढरे, महाराष्ट्र राज्य पुंभार समाजाचे प्रमुख सतीश दरेकर, भानुप्रताप बर्गे, राजेंद्र पुंजीर, पुणे शहर समन्वयक सचिन आडेकर, मराठा महासंघ संपर्कप्रमुख अनिल तागडे, सचिन साठे, अतुल शितोळे आदींनी मनोगत व्यक्त केले.
इतर समाज बांधवांनी सादर केल्या सूचना
लग्न व्यवस्थेच्या आचारसंहितेचा विषय फक्त मराठा समाजापुरता मर्यादित नसल्याने इतर समाज बांधवांनाही बैठकीस उपस्थित राहण्यासाठी आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी बऱ्याच उपस्थितांकडून वेगवेगळय़ा सूचना करण्यात आल्या. त्यांच्या सूचनांचा देखील समावेश आचारसंहितेत करण्यात येणार आहे.