
सामना प्रतिनिधी । जामखेड
जामखेड येथील खर्डा चौकात चार तासांपासून सकल मराठा समाजाचा रास्तारोको आंदोलन सुरू केले आहे. यामुळे पाच पाच किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पहिला हुतात्मा ठरलेले ‘काकासाहेब शिंदे अमर रहे’, अशा घोषणा देत सकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड पासून सकल मराठा समाजाच्या वतीने सकाळी मोटारसायकल रॅली काढण्यात आली व दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. दुकानदारांनी आपापली दुकाने बंद ठेवून मराठा समाजाला आपला पाठिंबा दर्शविला.
बीड रोडवरून मेन रोड खर्डा रोड नंतर बसस्थानकाजवळ आली व दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले नंतर बसस्थानकापासून खर्डा चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले.


























































