जिल्हाभरात मराठा आरक्षणासाठी आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जळगाव

राज्यभरात सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. रावेर तालुव्यात शुक्रवारी अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य  महामार्गावर शहरातील  डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जोरदार  घोषणा देत आंदोलकांनी  या  मार्गावरील  वाहतूक  रोखून  धरली  होती. यावेळी  तहसीलदार विजयकुमार ढगे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

माजी आमदार अरुण पाटील, माजी जि.प. सदस्य रमेश पाटील, रा.काँ.चे सोपान पाटील, कृउबा सभापती नीळवंठ चौधरी, शिवसेना  तालुकाप्रमुख योगीराज  पाटील,  माजी सभापती डॉ. राजेंद्र पाटील,  राजेंद्र चौधरी, किशोर पाटील, पं.स. सदस्य दीपक पाटील, विलास ताठे यांच्या प्रमुख उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी  माजी आमदार अरुण पाटील यांनी सरकारने आरक्षण तात्काळ द्यावे. अन्यथा आंदोलन चिघळल्या शिवाय राहणार नाही. इतर समाजबांधवांनी पाठिंबा दिल्याने त्यांचे आभार मानले. यानंतर सोपान पाटील, योगीराज पाटील, डॉ. राजेंद्र पाटील, सुरेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. पो.नि. नरेंद्र पिंगळे, सपोनि प्रकाश वानखेडे, गजेंद्र पाटील, दीपक ढोमने व सहकार्‍यांनी  बंदोबस्त  ठेवला होता. आंदोलनामुळे रावेर – बुर्‍हाणपूर, रावेर – सावदा, आणि पाल मार्गावरील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. आंदोलनाच्या यशस्वितेसाठी राजेंद्र चौधरी, गणेश चौधरी, योगेश पाटील, प्रशांत पाटील, सचिन पाटील,विलास ताठे, पी.आर. पाटील, गोंडू महाजन, राहुल महाजन, अमोल पाटील, रवींद्र महाजन, सीताराम पाटील, घनश्याम पाटील, जिजाबराव पाटील, राजेंद्र पाटील, ललित पाटील, सुनील पाटील, रवींद्र पाटील, दिलीप शिंदे, पिंटू दाणी, वामन पाटील, पांडुरंग पाटील यांनी परिश्रम घेतले.  समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वरणगाव : शहरातील दुकानदार व हातगाडीधारकांनी प्रतिसाद देऊन सर्व दुकाने व व्यापार बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. यावेळी मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष वाय.आर. पाटील यांनी मनोगत व्यक्त वरताना सांगितले की, मराठा समाजाने आजपर्यंत सर्वाधिक मूक मोर्चे काढले, ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली. मात्र तरी शासनाने याची दखल घेतली नाही. शेवटी समाजाला हिंसक होणे भाग पडले. कोणत्याही आरक्षित गटाच्या विरोधात आम्ही मुळीच नाही. मात्र मुद्दाम तसे सांगितले जात आहे. तरी न्यायालयात योग्य ती बाजू शासनाने मांडून यावर त्वरित निर्णय घ्यावा व दिलेली आश्वासने पाळावी, असे त्यांनी सांगितले.

सर्व व्यापारी, लहान-मोठे दुकानदार, रिक्षाचालक या सर्वांनी स्वयंस्फूर्तीने पाठिंबा देत वरणगावात कडकडीत बंद पुकारण्यात आला. यानंतर मराठा समाजास आरक्षण मिळालेच पाहिजे, मराठा क्रांती मोर्चाच्या वेळेस दिलेले आश्वासन पूर्ण करावे  या मागण्यासाठी पायी रॅली काढण्यात आली. यावेळी मनोज देशमुख, राजेंद्र चौधरी, अनिल पाटील, नगरसेवक राजेंद्र चौधरी, नीलेश पाटील, संभाजी देशमुख, पंकज पाटील, शिवाजी पाटील, अमोल पाटील, दीपक देशमुख, चंद्रकांत देशमुख, शरद देशमुख, अमोल देशमुख, शोभराज शेळके, प्रकाश मराठे, प्रशांत निंबाळवर, पवन मराठे, प्रशांत क्षीरसागर, शुभम पाटील, तुषार गावडे, अनिल सोनवणे, किरण पाटील, नितीन मराठे, दीपक पाटील, सदाशिव पाटील, विवेक सोनवणे, प्रशांत देशमुख, भूषण खराटे, दीपक पाटील, किरण संग्राम, गणेश संग्राम, हर्षल पाटील, रोहित चव्हाण, राहुल देशमुख, गणेश, शिवाजी, जितू मराठे आदी समाजबांधव उपस्थित होते.

भुसावळ : येथील नाहाटा कॉलेज चौफुली येथे सकल मराठा समाज, छावा संघटना यांच्यातर्फे २७ जुलै रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान आंदोलकांना भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात आणल्यानंतर लागलीच जामिनावर सुटका करण्यात आली. नाहाटा चौफुली परिसरास छावणीचे स्वरूप आले होते. आंदोलनात मराठा समाज अध्यक्ष महेंद्र पाटील, पंचायत समिती माजी सभापती राजेंद्र चौधरी, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, प्रमोद पाटील, छावाचे ईश्वर पवार, कृष्णा शिंदे, आनंद ठाकरे, रवींद्र लेकुरवाळे, सुनील पाटील, प्रमोद पाटील, जि.प. सदस्य रवींद्र पाटील, संजय शिंदे, राजेश देवपुजे, ईश्वर पवार, प्रवीण पाटील,  किरण पाटील, नरेश पाटील, संजय कदम, विनोद पवार, गजानन पवार, पिंटू भनगडे, सचिन हिंगणे, संजय जाधव, चंदू जाधव, सुधावर निकम, हितेश टकले, अप्पा ठाकरे, प्रशांत साळुंखे, रवी ढगे, बाळू गरुड, सुनील पाटील, सचिन पाटील, विजय पाटील, आकाश शिंदे, पिंटू इथापे, राजेश शिंदे व सर्व मराठाबांधव  मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लोहारा :  मूक मोर्चा बाजारपेठमधून निघून वाणी गल्ली, होळी चौक, आंबेडकरनगर, भवानी मंदिर, मेन रोड या मार्गाने बसस्थानकाजवळ समारोप करण्यात आला. पिंपळगांव हरेश्वर पोलीस ठाण्याचे सपोनि संदीप पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मोर्चात नंदू सुर्वे, महेंद्र शेळके, आबा पाटील, रमेश शेळके, चंद्रकांत पाटील, डॉ. देवेंद्र शेळके, किसन पाटील, रवींद्र पाटील, संजय पाटील, उखरडू बाविस्कर, लक्ष्मण बाविस्कर, विजय चौधरी, युवराज बापू पाटील, विठ्ठल पाटील, अर्जुन गायकवाड, कृष्णराव शेळके, उत्तमराव शेळके, कौतिक भोसांडे, बाळुअण्णा सुर्वे, सुभाष बाविस्कर यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा समाजाचे तरुण कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी पिंपळगांक हरेश्वर पोलीस ठाण्याचे सपोउप निरीक्षक संदीप पाटील, एपीआय शेळके,  हे.कॉ. निवृत्ती मोरे, संजय पाटील, पोलीस पाटील सुरेंद्र शेळके यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शहरात बंद पुकारण्यात आल्याने व्यापार्‍यांनी बंद ठेवलेली दुकाने.
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शहरात बंद पुकारण्यात आल्याने व्यापार्‍यांनी बंद ठेवलेली दुकाने.

 

मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम प्राधान्याने न वरता इतर बाबींना प्राधान्य देणार्‍या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जळगावात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवार, २९ रोजी जळगाव येथे येत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने पत्रकार परिषद आयोजित केली होती. परिषदेला जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार, एस.बी.पाटील, भीमराव मराठे, संजीव पाटील, प्रतिभा शिंदे, वंदना पाटील, प्रा. गोपाल दर्जी, प्रा. आर.व्ही पाटील, ऍड. सचिन पाटील, प्रमोद पाटील आदी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ  रविवार,  २९ रोजी दुपारी ३ वाजता जिह्यातील मराठा बांधव एकत्र येणार आहेत. याठिकाणी स्व.काकासाहेब शिंदे यांना श्रध्दांजली वाहण्यात येणार आहे. यानंतर मुख्यमंत्र्यांची सभा ज्याठिकाणी असेल तेथे जाऊन मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्यात येणार आहे.