बीडमधील हिंसाचारात दहा टोळय़ांचा सहभाग, आतापर्यंत 254 जणांना अटक; 300 फरार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा आरक्षणावरून बीड जिह्यात झालेल्या हिंसाचारात दहा टोळय़ांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आतापर्यंत दोन हजार जणांची चौकशी केली असून, 254 जणांना अटक केली आहे तर 300 जण अजूनही फरार आहेत. 30 ऑक्टोबर रोजी माजलगाव येथे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले. त्याबरोबरच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि आमदार संदीप क्षीरसागर यांचे घर पेटवले होते.