मराठा आरक्षणासाठी तरुणाचा जलसमाधी घेण्याचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, पंढरपूर

गंगापूर तालुक्यातील कानडगाव येथील काकासाहेब शिंदे यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी गोदावरी नदीवरील पुलावरून उडी मारत जलसमाधी घेतली. असाच एक प्रयत्न शनिवारी सकाळी पंढरपुरात झाला. इथल्या सुस्ते गावात सचिन शिंगण या तरुणाने भीमा नदीत उडी मारून जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या तरुणाचा जीव वाचला असल्याचं सांगण्यात आलं आहे. या तरुणाला उपचारासाठी पंढरपूरच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुस्ते येथील मराठा युवकांनी गावामध्ये ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सचिनने जल समाधी घेणार असल्याचे कालच जाहीर केले होते. इशारा दिल्याप्रमाणे शनिवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास सचिन शिंगणने भीमा नदीच्या पात्रात उडी घेतली

सोलापूर शहरात शनिवारी मराठा आरक्षणासाठी आंदोलक रस्त्यावर उतरले होते. इथल्या कुर्डूवाडी-बार्शी राज्यमहामार्गावर त्यांनी रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे इथली वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.